श्रीलंकेत पूर्वीच्या सरकारच्या काळातील खटल्यांच्या चौकशीसाठी आयोग

कोलोंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात 2015 ते 2019 दरम्यान राजकीय सुडबुद्धीने ज्यांच्यावर खटले दाखल केले होते. त्याची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती उपाली अबेयरत्ने यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे.

सरकारी अधिकारी, कर्मचारी, सैन्यातले अधिकारी, आणि पोलीस अधिकारी यांच्यावर हे खटले दाखल केले होते. तसेच खासगी गुंतवणूक कंपन्यांवर देखील अशाच पद्धतीने खटले दाखल केले होते, त्याची चौकशी देखील केली जाणार आहे. या आयोगामध्ये दोन सेवानिवृत्त वरिष्ठ न्यायाधीश आणि माजी पोलीस प्रमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या आयोगाला 9 जानेवारीपासून सहा महिन्यांच्या आत अहवाल घेऊन येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पोलिस, लाचलुचपत व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि पोलिसांच्या विशेष तपास यंत्रणेच्या फायनान्शियल क्राइम डिव्हिजन (एफसीआयडी) चे काम या चौकशीतून तपासले जाणार आहे. 9 जानेवारी 2015 ते 16 नोव्हेंबर 2019 रोजी राजपक्षे अध्यक्ष म्हणून निवडले गेले तेंव्हापर्यंतचे खटले तपासले जाणार आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.