मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह हे आज अनिल देशमुखांवरील वसुलीच्या आदेशाची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगापुढे चौकशीसाठी उपस्थित झाले. त्यांच्यावर आयोगाने या आधी जामीन पात्र वॉरंट जारी केले होते. पण आज ते हजर झाल्याने त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आले.
तथापि आयोगाने परमबीर सिंह यांना आर्थिक दंड केला असून मुख्यमंत्री निधीत पंधरा हजार रूपये भरण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या या चौकशी आयोगाने परमीवर यांना या आधी अनेक वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी केले होते पण ते त्यांनी न जुमानल्याने त्यांच्या विरोधात अखेर आयोगाला वॉरंट जारी करावे लागले होते.
परमवीर सिंह यांच्या विरोधात दाखल झालेल्या अनेक खंडणी प्रकरणात ते पोलिसांपुढे हजर न झाल्याने त्यांना कोर्टाने फरार घोषित केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने परमवीर यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर सहा महिन्याच्या बेपत्ता अवस्थेतून ते अलिकडेच मुंबईत प्रकट झाले आहेत.