GSTतील तरतुदीचा जाच असह्य! ‘या’ तारखेला व्यापाऱ्यांचा राष्ट्रव्यापी बंद

नवी दिल्ली – एकत्रित वस्तू आणि सेवा कायद्यातील (जीएसटी) काही अटी व्यापाऱ्यांसाठी जाचक आहेत. या तरतुदी रद्द कराव्यात यासाठी व्यापाऱ्याच्या संघटनेने 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आयोजन केले आहे.

26 फेब्रुवारी रोजी देशातील लाखो व्यापारी आपली दुकाने बंद ठेवतील. त्याचबरोबर 1,500 ठिकाणे धरणे धरण्यात येईल. जाचक अटी रद्द करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जीएसटी परिषदेने पुढाकार घ्यावा असे आवाहन कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे सीएआयटी ने केले आहे. या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, जीएसटी परीषसेने जीएसटी व्यवस्थेचा आढावा घ्यावा.

त्याचबरोबर जीएसटीचे टप्पे सोपे करावे त्यामुळे व्यापाऱ्यांना हा कर भरणे सोपे जाईल.ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेने व्यापाऱ्याच्या संघटनेला पाठिंबा दिला असून 26 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सर्व व्यापारी संस्था बंद राहतील.

व्यापाऱ्यांच्या देशभरातील 40 हजार संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यानी स्वत: होऊन कर भरण्याची व्यवस्था विकसित केली पाहिजे. त्यामुळे करदात्यांची संख्या वाढेल आणि कर संकलन वाढेल. खंडेलवाल म्हणाले सांगितले की, गेल्या चार चार वर्षांमध्ये जीएसटीत 950 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

मात्र तरीही व्यापाऱ्यांना सहजासहजी कर भरता येत नाही. वेळोवेळी पोर्टल खराब होते. यामुळे व्यापाऱ्यांना स्वतःचे काम सोडून कर भरण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. जीएसटीमुळेमुळे कर भरणे सोपे होण्याच्या ऐवजी गुंतागुंत वाढली आहे असा दावा त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.