विरार रुग्णालयातील दुर्घटनावर आरोग्य मंत्री म्हणाले,’ही घटना नॅशनल न्यूज नाही’

मुंबई –  विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूने महाराष्ट्र हळहळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भावुक झाले असून त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

याच दरम्यान आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,“ही घटना (विरार रुग्णालय आग) ही नॅशनल न्यूज नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत, ही राज्यातील घटना आहे.’ 

ते पुढे म्हणाले,’ आपण  राज्यात होणाऱ्या ऑक्सिजन ,रेमडेसिवीर तुटवड्याबाबत बोलायला हवे, या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायला हवं, मी या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत.” असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. “विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.