‘त्या’ वक्त्यावरून अभिनेता अर्जुन कपूरची साध्वी प्रज्ञा यांच्यावर टीका 

नवी दिल्ली – महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणाऱ्या भाजपा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या या विधानावरून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच बॉलिवूड अभिनेता ‘अर्जुन कपूर’ने देखील आपले मत व्यक्त केले आहे.

“मतांसाठी प्रयत्न करत असताना, लोकांना जबाबदारीची सुध्या जाणीव राहिलेली नाही’. अशी संतप्त जनक टीका अर्जुन कपूर याने केली आहे. अशा लोकांना संवेदनशील वक्तव्ये करून फक्त लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि हवामान बदल यावर कोणताच राजकीय नेता भाष्य करताना दिसत नाही. भूतकाळातल्याच घटना उकरून काढून त्यावर विधानं केली जात आहेत’. असं देखील अर्जुन म्हणाला आहे. दरम्यान, भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरने तिच्या या वक्तव्याबद्दल माफी देखील मागितली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.