#Live : मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात; पहिला मान राधाकृष्ण विखे-पाटलांना

मुंबई – अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेला अखेर आज पूर्ण विराम मिळाला. उद्यापासून (सोमवारी) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.


आजच्या शपथविधी सोहळ्यात भाजपात प्रवेशाची केवळ औपचारिकता उरलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद मिळणार काय? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच भाजपतर्फे त्यांना आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम शपथ घेण्याचा मान देण्यात आला. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील शपथ ग्रहण करत असताना उपस्थितांनी कसल्याच प्रकारची दाद दिली नाही मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी शपथ घेताच आवाज कुणाचा शिवसेनेचा असा जयघोष करण्यात आला. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनी शपथ ग्रहण केली. त्यांच्या शपथविधीनंतर देखील उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आशीष शेलार मंत्रिपदाची शपथ दिली.

उद्धव ठाकरे अनुपस्थित
उद्धव ठाकरे हे रविवारी शिवसेनेच्या 18 खासदारांना घेउन अयोध्येला दौऱ्यावर गेले असल्याने त्यांनी शपथविधीला अनुपस्थित दर्शवली.

दुसरीकडे प्रकाश मेहतांसह या मंत्र्यांची राजीनामे..
प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.

विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री 

नवे कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील-  उत्तर महाराष्ट्र
आशिष शेलार-     मुंबई
संजय कुटे-      विदर्भ
सुरेश खाडे –  कॅबिनेट पश्चिम महाराष्ट्र
डॉ. अनिल बोंडे- विदर्भ
अशोक उईके-     विदर्भ
जयदत्त क्षीरसागर-    मराठवाडा
तानाजी सावंत-   यवतमाळ विदर्भ

नवे राज्यमंत्री
योगेश सागर – मुंबई
अतुल सावे   – मराठवाडा
परिणय फुके –   विदर्भ
अविनाश महातेकर – मुंबई
संजय उर्फ बाळा भेगडे-  पुणे पश्चिम महाराष्ट्र राज्यमंत्री

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here