Home loan interest rates : गृहकर्जदारांसाठी दिलासादायक बातमी; स्टेट बँकेनं घटवले व्याजदर

मुंबई – भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी घरासाठी कर्जाचे व्याजदर 0.10 टक्‍क्‍यांनी कमी केले. स्टेट बॅंकेचे घरासाठीच्या कर्जाचे व्याजदर 6.70 टक्‍क्‍यापासून सुरू होतील. कर्जाची रक्कम आणि सिबिल स्कोअरच्या आधारावर नवे दर लागू होणार असून हे नवे दर 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध राहतील असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

75 लाखापर्यंतच्या घरासाठीच्या कर्जासाठीचे व्याजदर 6.70 टक्‍क्‍यापासून सुरू होतील. तर 75 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंतच्या घरासाठीच्या कर्जाचे व्याजदर 6.75 टक्‍क्‍यापासून सुरू होतील. मार्च हा भारतातील आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्याचबरोबर या महिन्यात होळी आणि इतर सण येतात. याचा फायदा घेण्यासाठी स्टेट बॅंकेने एक महिन्यासाठी ही सवलत दिली असल्याचे बॅंकेचे उपव्यवस्थापकीय संचालक सलोनी नारायण यांनी सांगितले.

प्रक्रिया शुल्क लागणार नाही…

विशेष म्हणजे हे गृह कर्ज घेण्यासाठी बॅंकेने प्रक्रिया शुल्क 100% कमी केले आहे. म्हणजे प्रक्रिया शुल्क अजिबात लागणार नाही.

योनो ॲप वापरणाऱ्यांना फायदा..

बॅंकेच्या योनो ॲपच्या माध्यमातून कर्जाची मागणी केल्यानंतर अतिरिक्त0.05 टक्‍क्‍यांची सवलत मिळणार आहे. गृहकर्जाच्या वसुलीमध्ये आम्हाला कसल्याही अडचणी दिसत नाहीत. तरीही आम्ही ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांच्या खात्याकडे लक्ष देऊन आहोत. बॅंकेची घरासाठीच्या कर्जावरील अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.68 टक्के असल्याचे गेल्या महिन्यात बॅंकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.