नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 376 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. गेले काही दिवस सातत्याने ही रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, सक्रिय बाधितांची संख्या काहीशी वाढलेली दिसत आहे.
ही संख्या आता 3 लाख 91 हजार 516 झाली आहे. काल दिवसभरात करोनामुळे 308 जणांचा मृत्यू झाला असून या मृतांची एकूण संख्या आता 4 लाख 42 हजार 317 झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोविडचा रिकव्हरी रेट आता 97.49 झाला आहे. दरम्यान, देशातील कोविडचा किमान एक तरी डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता 73 कोटी 5 हजार इतकी झाली आहे.