नवी दिल्ली – देशात एका दिवसात 31 हजार 443 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. ती 118 दिवसांतील सर्वांत कमी दैनंदिन वाढ ठरली आहे.
देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 3 कोटी 9 लाखांवर पोहचली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नव्या बाधितांच्या संख्येतील घट दिलासादायी ठरत आहे. आतापर्यंत 3 कोटींहून अधिक बाधित बरे झाले आहेत.
देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 4 लाख 31 हजार 315 इतकी झाली आहे. त्यांचे प्रमाण एकूण बाधितांच्या अवघे 1.40 टक्का आहे. बाधित बरे होण्याचा दर वाढून 97.28 टक्क्यांवर पोहचला आहे. देशभरात आतापर्यंत करोनावरील लसींचे 38 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.