नवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ जणांनी करोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत देशात ५२ हजार ९७२ जणांना करोना विषाणूची लागण झाली होती. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे.
Single-day spike of 52,972 positive cases & 771 deaths in India in the last 24 hours.
India's COVID19 tally rises to 18,03,696 including 5,79,357active cases, 1,186,203 cured/discharged/migrated & 38,135 deaths: Health Ministry pic.twitter.com/OKfjsgwyC9
— ANI (@ANI) August 3, 2020
आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, गेल्या २४ तासात देशात ५२ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात पाच लाख ७९ हजार ३५७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत ३८ हजार १३५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. भारतातील करोना चाचणीने दोन कोटींचा पल्ला ओलांडला आहे. दोन ऑगस्टपर्यंत भारतात दोन कोटी दोन लाख दोन हजार ८५८ करोना चाचणी झाल्या आहेत. रविवारी भारतात तीन लाख ८१ हजार २७ करोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राज्यस्थानसारख्या राज्यात करोनाची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांत ९ हजार ५०९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत रुग्णांची संख्या १५ हजार ५७६ इतकी झाली आहे. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण असून यामधील सर्वाधिक केसेस पुण्यात आहेत. पुण्यात सध्या करोनाचे ४४ हजार २०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.