नवी दिल्ली : करोनाच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. कारण मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
Number of patients recovering from #COVID19 continues to increase. So far, 2,27,755 patients have been cured. During the last 24 hours, a total of 13,925 COVID-19 patients have been cured. The recovery rate has further improved to 55.49% amongst COVID-19 patients: Govt of India
— ANI (@ANI) June 21, 2020
देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. असे असले तरी नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, दिलासादायक बाब म्हणजे दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण २ लाख २७ हजार ७५५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, मागील २४ तासांत १३ हजार ९२५ जण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण करोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ते ५५.४९ टक्क्यांवर पोहचले आहे. केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.