दिवसभरात तब्बल आठ लाखांहून अधिक नागरिकांना डोस
मुंबई – करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी शनिवारी नोंदविली. राज्यात दिवसभरात 8 लाख 11 हजार 542 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला.
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 31 हजार 232 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले,
लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
गेल्या तीन महिन्यांत लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहिली आहे. प्रत्येक दिवशी आधीच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. रात्री उशिरापर्यंतची आकडेवारी हाती आली असता दिवसभरात 8 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली आहे, असे डॉ. व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 जून रोजी 7 लाख 38 हजार 704 नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण करण्यात आले होते.