दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी देशात करोनाबाधितांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : देशात दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. अनेकांचे या करोनाने बळी घेतले. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत आहे. दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशात सलग दुसऱ्या दिवशी देशात करोना रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. आज (शनिवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याविषयी आकडेवारी जाहीर  केली.

गेल्या २४ तासांत करोनाचे ३९ हजार ०९७ नवीन रुग्ण आढळले. तर ५४६ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  काल (शुक्रवार) ३५,३४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३५ हजार ०८७ जणांनी करोनावर मात केली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दरम्यान काहीसं दिलासादायक वातावरण देशात आहे. सध्या देशात ४ लाख ०८ हजार ९७७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आतापर्यांत देशात ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ०१६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.