दिलासादायक ! देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे पण त्याच्या 20 टक्के वेगाने कोरोना रुग्ण बरे देखील होत आहेत. देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊन आता ही संख्या सात लाखांपेक्षा कमी झाली आहे.

आतापर्यंत 10 कोटी लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा एकूण पॉझिटिव्हिटी रेट 7.81 टक्के आहे आणि दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 3.8 टक्के आहे. अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 54 हजार 366 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 690 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 73 हजार 979 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 77 लाख 61 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एक लाख 17 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 लाख 49 हजार जण आतापर्यंत बरे झाले आहे. शिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 6 लाख 95 हजारांवर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.