दिलासादायक ! “वर्षभरात करोनाची साथ संपूर्णपणे संपुष्टात येईल”

न्यूयॉर्क  – जागतिक मागणीनुसार आज जगभरातील अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळेच लवकरच करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल. साधारणतः पुढील वर्षभरामध्ये करोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात येईल, असे मत मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बैसेल यांनी व्यक्‍त केले.

स्टीफन म्हणाले, जगभरामध्ये फारच वेगाने लसींची निर्मिती केली जात आहे. याच वेगाने उत्पादन होत राहिल्यास पुढील वर्षापर्यंत मध्यापर्यंत जगभरातील सर्व लोकांसाठी लस उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच एका वर्षभरामध्ये परिस्थिती पूर्वीप्रमाणे सामान्य होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

तसेच स्टीफन यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे. जे लोक लसीकरण करुन घेत आहेत ते भविष्यात या विषाणूमुळे होणाऱ्या धोक्‍यापासून सुरक्षित राहतील. तसेच जे लोक लस घेणार नाहीत त्यांना डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग होऊन रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची पुन्हा वेळ येऊ शकते, असा इशाराही स्टीफन यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.