पुणे -जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आतापर्यंत 36 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. तर कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रात 6 रूग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये एकट्या जुन्नर तालुक्यात 20 रूग्ण सापडले असून, त्यातील 16 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
तर ग्रामीणमधील 36 रूग्णांपैकी 24 रूग्ण बरे झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्र मिळून आतापर्यंत एकूण 42 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 8 रूग्णांची परदेशातून आल्याची माहिती आहे. जुन्नर तालुक्यात 20 रूग्ण सापडले असून, हवेली आणि आंबेगाव तालुक्यात प्रत्येकी 4 रूग्ण सापडले आहेत.
मुळशी तालुक्यात 5, शिरूर तालुक्यात 2 तर पुरंदर तालुक्यात 1 रूग्ण आढळून आला आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यात 16 रूग्ण बरे झाले असून, 4 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आंबेगाव तालुक्यातील 2 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. हवेलीमध्ये 3, मुळशी 1 आणि शिरूर तालुक्यातील 2 असे एकूण 24 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.