आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी महिलांनी मागितली भीक

हॉकर्स झोनबाबत आंदोलन तीव्र; सहकार मंत्र्याशी पदाधिकारी करणार चर्चा

कराड  (प्रतिनिधी) -हातागाडाधारक संघटनेतील महिलांनी महिला दिना दिवशीच शहरात हॉकर्स झोन होत नसल्याच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जावून भिक मागीतली. त्याशिवाय हॉकर्स झोन व्हावा, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी युवा नेते इंद्रजित चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अतिक्रमण हटाव मोहिमे सुरू असल्यापासून दहा दिवस व्यवसाय बंद आहे. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही पालिका हॉकर्स झोनबाबत काहीही निर्णय घेत नसल्याचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. हातगाडा व्यावसायिकांच्या रोजी रोटीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने शनिवारी पालिका पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हॉकर्स झोन झाल्यास शहरातील अतिक्रमणे व आमचा रोजी रोटीचा प्रश्‍नही मिटेल. त्यामुळे पालिकेने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केले. यावेळी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

हॉकर्स झोनबाबत विशेष सभा बोलवावी
शहरातील हॉकर्स व्यवसायिकांचा प्रश्न दिर्घकाळ प्रलंबित राहिला आहे. अशा सर्व प्रश्नांबाबत नगरपालिकेची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी सर्व धर्मिय सुशिक्षीत बेरोजगार हॉकर्स संघटनेने लेखी निवेदनाव्दारे पालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याकडे केली आहे. अतिक्रमण मोहीम राबवताना काही ठिकाणी भेदभाव झाला आहे. त्यामुळे या प्रश्नासह अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या हॉकर्स झोनबाबत चर्चा करण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा बोलवावी अशी मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.