कोल्हापूर/प्रतिनिधी: एरव्ही शिवसेनेच्या विरोधात भाष्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मात्र शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. आजही त्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील ठाम होते. शिवसेना भाजपा स्वतंत्र लढू मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा पद्धतीचा निर्धार देखील चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला. ते कोल्हापूरात बोलत होते.
तसेच 80 व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्रातभर फिरतात मात्र मुख्यमंत्री घरात बसतात… मग शरद पवारांनीचं मुख्यमंत्री व्हावं असही चंद्रकांत पाटील म्हणाले.