आळंदी – आपल्या व्यवसायात कोण काय शक्कल लढवेल, याचा नेम नसतो. अशीच एक शक्कल लढवली आहे ती आळंदी (ता. खेड) येथील काशिद या सलून चालकाने. ते जो वस्तारा चालवतात त्यालच सोन्याची झळाळी दिली आहे.
जवळपास चार लाख रुपये खर्च करून 8 तोळ्याचा सोन्याचा वस्ताराच बनवला आहे. आता या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी त्यांच्याकडे ग्राहक येत आहेत.
दरम्यान, सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करणारे पुणे जिल्ह्यातील बहुदा हे पहिलेच सलून असावे. आता या वस्तऱ्याने दाढी करायचे दर 200 रुपये जरी असले तरी किमान एकदा तरी या वस्तऱ्याने दाढी करायची इच्छा आळंदीकरांमध्ये आहे.