पुणे : कयार वादळाचा फटका कोकणच्या किनार पट्टीला बसण्याची शक्यता असून कोकणात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कयार चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान शनिवारी जोरदार वाऱ्याबरोबर काही ठिकाणी विज कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रविवारी (दि. 27) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून दि. 30 पर्यंत पावसाची हि स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात या वादळामुळे 55 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याचीशक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 70 किमीपर्यंत वाढण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाउ नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.