संगमनेर: राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून ईदगाह मैदानाजवळ ट्रीमीक्स कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असून, या कामाची पाहणी आ. थोरात यांनी केली. या कामासाठी अजून नव्याने 10 लाखांचा निधी ही देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
इदगाह मैदान ट्रीमीक्स कॉंक्रीटीकरण रस्त्याच्या कामाची पाहणी आ. थोरात यांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष वसीम शेख, शेख गनी हजी, नुरमोहम्मद शेख, शौकत मोहमद खान, अफजल शेख, रईस बेपारी, अरिफ देशमुख, एजाज शेख, आसिफ पठाण, सलीम पठाण, हजल शेख, ईम्रान शेख, हुसेन शेख, रिजवान शेख, मुन्ना सय्यद आदी उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नव्याने साकारलेले बसस्थानकासह, संगमनेर शहरात वैभवशाली इमारती, रस्ते, भूमिगत गटारे, 25 नवीन उद्याने अशी विविध कामे पूर्ण झाली आहेत. नगरपालिकेने दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देताना सार्वजनिक स्वच्छता असे अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक सलोखा व शांतता नांदणाऱ्या या शहराला आ. बाळासाहेब थोरात यांच्या ऐतिहासिक निर्णयातून झालेल्या थेट निळवंडे पाईपलाईन योजनेमुळे राज्यात सर्वत्र दुष्काळ असताना सर्वांना स्वच्छ व भरपूर पाणी मिळत आहे.
इदगाह मैदानाची दुरुस्तीसह या रस्त्यावर ट्रीमीक्स कॉंक्रीटीकरण करण्यात येत असून, शहरात अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.इदगाह मैदानाची दुरुस्तीसह रस्त्यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनी 10 लाखांच्या निधीतून दिला असून, या कामासाठी अजून 10 लाखांचा निधी देणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहरातील विविध नागरिक उपस्थित होते.