आ. कोल्हेंनी घेतला घरकूल कामांचा आढावा 

कोपरगाव- कोपरगाव शहरातील प्राधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या 211 घरकुलांच्या कामाचा आढावा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घेतला. या बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी उपस्थित होते. आमदार कोल्हे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत सहभाग द्यावा, असे आवाहन केले.

आ. कोल्हे म्हणाल्या, घरकूल योजनेचा फायदा जास्तीत जास्त गरजूंना मिळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने यात अधिक लक्ष घालावे. सरकारी जागेवर राहणारे नागरिक यापासून वंचित असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता शासनाने लवकरात लवकर सदरच्या जागा नियमाकूल करून संबंधितांना न्याय द्यावा. या बैठकीस उपनगराध्यक्ष विजय वाजे, सर्व नगरसेवक, बांधकाम अभियता सुराळकर, प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेचे सर्वेक्षण अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रातांधिकारी गोविंद शिंदे म्हणांले, नगरपालिकेने डोअर टू डोअर सर्व्हे करून जास्तीत जास्त नागरिकांना य योजनेचा फायदा कसा होईल, याचे प्रयत्न करावेत. पूररेषेत येणाऱ्या रहिवाशांचा सर्व्हे स्वतंत्ररित्याकरून त्यांना या योजनेचा फायदा कसा मिळेल, यासाठी प्रस्ताव तयार करावा.

या योजनेत पूर्वीच्या यादीत काही नागरिकांचा समावेश होता. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही नावे समाविष्ट झालेली नाहीत, अशी नावे शोधून तसा प्रस्ताव नगरपालिकेमार्फत आपल्याकडे पाठवावा, असेही शिंदे म्हणाले. राघोबादादा वाड्याशेजारी 22 कुटुंबे अतिक्रमित जागेत राहतात. त्यांचे पुनर्वसन या योजनेत करण्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत. आमदार कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव ग्रामीणचा त्रिशंकू भाग शहर हद्दवाढीत समावेश झालेला असल्याने त्या भागातील रहिवाशांना नागरी सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेने लवकरात लवकर डीपीआर तयार करून घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. प्रलंबित प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना सूचना केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.