‘देर आए, दुरुस्त आए’ – जया बच्चन 

नवी दिल्ली –  हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या घटनेवर खासदार जय बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देर आए दुरुस्त आए, लेकिन देर से आए, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. चारही आरोपींना त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)