राजकारणात या, मी देतो संधी; राज ठाकरेंचं ‘या’ लोकांना आवाहन

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मैदानात उतरला आहे. यासाठी मनसेकडून नाव नोंदणी सुरू कऱण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षासोबत माणसं जोडण्याची योजना मनसेची आहे. खुद्द राज ठाकरे यांनी मनसेसोबत येण्यासाठी आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नागरिकांना जोडण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात येत आहे. यानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन नाव नोंदणी करण्यात येत आहे. तर तुम्ही मिस्ड कॉल देऊन सुद्धा मनसेशी जोडले जावू शकता. राज ठाकरे यांनी ट्विटरवरून नागरिकांना मनसेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. मनसेची ही नोंदणी राज्यभर सुरू आहे. पुढील काळात राज्यातील अनेक महानगर पालिकांच्या निवडणुका आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने तयारी सुरू केली आहे.


राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे. पक्षाची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठी mnsnondani.in ला भेट द्या किंवा पक्षाच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.