आ. काळेंमुळे नुकसानीचे झाले तात्काळ पंचनामे

तालुक्‍यातील कोळपेवाडी, शहाजापूर, मढी, कुंभारी शिवारात अतिवृष्टी
कोपरगाव  –
तालुक्‍यातील कोळपेवाडी, शहाजापूर, मढी, माहेगाव देशमुख व कुंभारी शिवारात रविवारी (दि.3) झालेल्या अतिवृष्टीने आदिवासी कुटुंबासह नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचे आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून नागरिकांना धीर दिला. तसेच तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना करून तातडीची मदत उपलब्ध करून दिली.

रविवारी रात्री 9.30 ते 10.30 वाजता कोळपेवाडी, शहाजापूर, मढी, माहेगाव देशमुख व कुंभारी शिवारात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पावसामुळे आदिवासी कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य वाहून गेले. शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पटेलवस्ती परिसरात नाल्याला पाणी आल्यामुळे शिर्डी-लासलगाव मार्ग रात्री काही वेळ बंद होता. पाणी ओसरल्यानंतर हा मार्ग पुन्हा सुरु झाला.

या अतिवृष्टीची माहिती समजताच आ. काळे यांनी नुकसानीची पाहणी केली. आपत्तीग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यातर्फे तातडीची मदत दिली. आ. काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना घटनास्थळी बोलवून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना केल्या. तसेच आपत्तीग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली. तहसीलदार चंद्रे अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पोहोचताच त्यांच्या समवेत आलेले तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, कोळपेवाडीचे मंडल अधिकारी मनोज सोनवणे, कृषी सहायक ज्ञानेश्वर पवार, तलाठी गणेश गरकल, सुनील साबणे, संदीप ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले.

या अतिवृष्टीचा एकूण 165 कुटुंबांना फटका बसला आहे. यात कोळपेवाडी-42, शहाजापूर-60, मढी-28, कुंभारी-31, माहेगाव देशमुख-4 कुटुंबांचा समावेश आहे. शहाजापूरमध्ये असलेल्या परसरामनगरमधून मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरल्यामुळे अनेक नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. कोपरगाव मतदारसंघात ज्या ठिकाणी अश अतिवृष्टीच्या घटना घडल्या आहेत, त्या ठिकाणीही तातडीने पंचनामे करावे. रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये, यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना आ. काळे यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी गौतम सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, विठ्ठल वाबळे, निवृत्ती वाबळे, पांडुरंग ढोमसे, भीमा मोरे, दिलीप मोरे, मुश्‍ताक पटेल, नाना वाबळे, केशव वाबळे, नारायण वाबळे, शोएब पटेल, मच्छिंद्र देशमुख, महेंद्र वाबळे, शंकर वाबळे, अल्ताफ पटेल, शकील पटेल, कुंभारीचे उपसरपंच दिगंबर बढे, अण्णासाहेब बढे, आशिष थोरात, भास्कर कदम, चंद्रकांत कदम, मढीचे उपसरपंच अनिल गवळी आदींनी सहकार्य केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)