पारनेर – आ. नीलेश लंके यांना गोवंडी, मुंबई येथील भीमप्रेरणा मित्र मंडळातर्फे यंदाचा भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 6 मे रोजी सायंकाळी सात वाजता दत्तनगर, गोवंडी येथे पार पडणाऱ्या सोहळयात आ. लंके यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण रणशेवरे व सचिव दीपक चौकेकर यांनी आ. लंके यांच्या पुरस्कारासंबंधी कळविले आहे. आ. लंके यांचे कार्य, तसेच राजकारण दूर ठेवून करोना काळात हजारो रुग्णांना दिलेले जीवदान या सामाजिक बांधिलकीची भीमप्रेरणा मित्र मंडळाने दखल घेतली आहे.