आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी वस्तीतील महिला एकत्र

सुभद्रा सूर्यवंशी यांनी अन्नपूर्णामधून ११ वर्षपूर्वी सात हजाराचे कर्ज घेऊन स्वताचा वेफर्स पॅकिंगचा व्यवसाय चालू केला. त्याच बरोबर चिवडा,इतर खाद्यपदार्थ,चिक्की, गोळ्या याचा माल भरून व वस्तीतील इतर ८ ते १० महिलांना एकत्र घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. आता त्या अन्नपूर्णा मधून ९८,००० हजाराचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय उत्तमरित्या चालवत आहेत. अशाच एक उद्योजक महिला आहेत रेखा कांबळे यांनी आपल्या फुलांच्या व्यवसायासाठी १० वर्षापूर्वी दहा हजार कर्ज घेऊन उद्योगाला सुरुवात केली. आता त्या सात महिलांच्या मदतीने खडकी येथे आपला फुलांचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहे. अशाच अनेक उत्कृष्ट उद्योजिकांना अन्नपूर्णा परिवाराने आपल्या वार्षिक सभासद मेळाव्या ‘उत्कृष्ट उद्योजिका’ म्हणून सन्मानित केले.

अन्नपूर्णा पारिवार ही पुणे व मुंबई मधील वस्तीन मध्ये सक्रीय असणारी व महिला सक्षमीकरणावर काम करणारी संस्था आहे. हा अन्नपूर्णाचा २६वा वार्षिक सभासद मेळावा होता, यामध्ये पुण्याच्या वस्तीतील आठ हजार हून अधिक महिला सहभागी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळाच्या सह-संस्थापक मनीषा गुप्ते उपस्थित होत्या. तसेच इंडियन ओव्हरसीज बँकचे सहाय्यक जनरल मॅनेजर श्री. थॉमस मिरांडा व अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापक व अध्यक्षा डॉ.मेधा सामंत पुरव ही या वेळी उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्नपूर्णा परिवाराने २०१८ या वर्षामध्ये २०० कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे आणि ते ही महिलांना विनातारण देण्यात आलेले आहे. या कर्जाचा परतफेड दर हा १००% आहे. तसेच अन्नपूर्णा परिवार बचतीवर उत्कृष्ट व्याजदर देते व या वर्षी बचतीची रक्कम ६० कोटीवर गेली आहे. असे या वेळी सांगण्यात आले.

या निम्मित डॉ.मेधा पुरव सामंत अशा म्हणाल्या की “या वर्षी आम्ही सर्व महिलांना कॅशलेस सेवा पुरवल्या आहेत. त्यासाठी सर्व महिलांचे बँक खाते आम्ही उघडले आहेत” तसेच कर्जाची रक्कम वाढवून तीस हजार ते दोन लाख एवढी विनातारण दिली जाणार असून, आरोग्य विमा १,७०० ते ३०,००० एवढ्या रक्कमेचा दिला जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)