दुबई –न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने भारताचा कर्णधार विराट कोहलीसह आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत संयुक्त दुसरे स्थान मिळवले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केल्यामुळे विल्यमसनचे क्रमवारीतील स्थान सुधारले आहे. ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज स्टिव्ह स्मिथने क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले असून भारताचा चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानी कायम राहिला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडच्या निल वॅगनरने दुसरे स्थान मिळवले असून भारताचा जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी कायम आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही रवींद्र जडेजानेही आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.