Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन

दुर्गाचं भावविश्व रंगवणारी मालिका “लेक माझी दुर्गा” कलर्स मराठीवर !

१४ फेब्रुवारीपासून दररोज संध्या. ७.३० वा.

by प्रभात वृत्तसेवा
February 11, 2022 | 11:14 am
A A
दुर्गाचं भावविश्व रंगवणारी मालिका “लेक माझी दुर्गा” कलर्स मराठीवर !

मुंबई  : असं म्हणतात “आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वात सुंदर पान म्हणजे बालपण”. बालपणावर आपण सगळ्यांनीचं बरंच काही ऐकलं आहे नाही का ? जर, बालपणावर बोलायचं किंवा लिहायचं म्हंटल तर शब्द आणि वेळ दोन्ही अपुरं पडेल. पण, यामधील अविभाज्य घटक म्हणजे आई – वडील, त्यांना विसरून कसं चालेल. आई वडिलांच्या प्रेमाच्या बळावर प्रत्येक मुलं अनेक अडचणींवर मात करू शकतं. दु:ख आणि वेदनेच्या निखाऱ्यावरून हसत हसत चालू शकतं.

बालपणाच्या या भावविश्वात एकाचं जरी प्रेम अपुर पडलं, मिळालं नाही तर त्याचे व्रण आयुष्यभर मनावर कोंदणासारखे राहतात. बालपणाचा पायाचं जर अनेक वेदनांनी आणि कटू आठवणींनी भरलेला असेल तर ते बालपण कधीच आयुष्यातील सुंदर पान वाटू शकणार नाही. याच धाग्यावर आधारित आई आणि मुलीचं हळूवार भावनिक नातं उलघडणारी हृद्यस्पर्शी मालिका कलर्स मराठीवर घेऊन येत आहे “लेक माझी दुर्गा” – जाणीव “ती” च्या अस्तित्वाची १४ फेब्रुवारीपासून दररोज संध्या ७.३०. वा.

या मालिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्या पलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मालिकेमध्ये दुर्गाच्या भावविश्वात कुठेतरी वडिलांकडून तिला तुच्छ दर्जाची वागणूक मिळते आहे तर दुसरीकडे आईचे भरभरून प्रेम मिळते आहे. दुर्गाला आईच्या प्रेमापेक्षा तिच्या वडिलांच्या डोळ्यातील आग सलतेय. तिच्या या भावविश्वात तिला स्वत:च्या अस्तित्वासाठी का बरं संघर्ष करावा लागतो आहे ? का तिला वडिलांकडून झिडकारल जातं आहे ? लवकरच या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. अग्रगण्य क्रीएशन्स निर्मित आणि अभिजीत गुरु लिखित “लेक माझी दुर्गा” मालिकेद्वारे हेमांगी कवि पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बालपणातल्या आठवणी सोन्यासारख्या असतात ज्या आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत असतात. ते म्हणतात जितकं आपलं बालपण सरल तितका पुढचा प्रवास सोपा. पण, सगळ्यांच बालपण इतकं सुंदर आणि मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावं असं असतं का? सातार्‍या जवळच्या एका छोट्या गावात राहणार्‍या जगताप कुटुंबाच्या “दुर्गा” चे भावविश्व जरा इतर लहान मुलांपेक्षा वेगळं आहे. जिथे तिला खेळायला मोठं आंगण आहे, घरात प्रेम करणारी, माया देणारी आई आहे, प्रेमळ, खाऊ देणारा, सगळ्यांना प्रेम करणारा बाबा आहे. दुरून जरी हे भावविश्व वा चित्र एकदम सुंदर दिसतं असलं तरीदेखील दुर्गाला मात्र एक प्रश्न सतत पडतो आहे माझा बाबा मला दूर का बरं ठेवतो ? माझ्यावर का प्रेम नाही करत ? मी इतकी वाईट आहे का ? तिच्या वडिलांच्या मते ती घराला लागलेली कीड आहे. त्यामुळे तिच्या वाटणीचे प्रेम, माया देखील दुसर्‍या मुलीला देत आहे. का बरं असा भेदभाव होत असेल ? या मालिकेमधून मनोरंजनासोबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्यपरिस्थिति आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) – अनिकेत जोशी म्हणाले, कलर्स मराठीने नेहेमीच मराठी माणसाशी नाळ जोडणारे, समकालीन आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून जे कार्यक्रम आणि मालिका बघता येतील असे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणले आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या घवघवीत यशानंतर त्याजागी एखादी दमदार आणि वेगळ्या धाटणीची मालिका आणण्याचा आमचा प्रयत्न होता. “लेक माझी दुर्गा” या मालिकेतून अत्यंत महत्वाच्या बाबीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे, जसे हळूहळू मालिकेचे कथानक पुढे जाईल तसे प्रेक्षकांना समजेलच.

या मालिकेत दाखविण्यात येणार्‍या गोष्टी आपण अजूनही समाजात घडताना बघतो आहे, त्यामुळे अधिक अचूक पद्धतीने दाखविण्याची आमची जबाबदारी वाढते. आपल्या सगळ्यांनाच भावणार आणि जवळच नातं म्हणजे आई – मुलांचं नातं. त्याच पार्श्वभूमीवर या मालिकेची मांडणी करण्यात आली आहे. या नवीन वर्षातली आमची पहिली मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेलं अशी आम्ही आशा करतो. बाळूमामाच्या नावानं चांभागलं या मालिकेची वेळ बदलण हा सर्वांगी विचार करून घेतलेला निर्णय असून प्रेक्षकांचे प्रेम त्या मालिकेला मिळत राहील अशी आशा आम्ही करतो.”

मालिकेनिमित्त बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) – विराज राजे म्हणाले, “नात्यांचे विविध पैलू, नात्यातील अनोखी बाजू आणि त्याच्यावर भाष्य करणार्‍या मालिका कलर्स मराठीने आजवर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. ते म्हणतात ना काही प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. अगदी तसंच दुर्गा आणि तिच्या आईचं असणार आहे लेक माझी दुर्गा मालिकेमध्ये. दुर्गाच्या अनेक प्रश्नांना तिच्या आईला सामोरं जावे लागणार आहे. या मालिकेत मुलीचा बालपणापासूनचा खडतर प्रवास आणि तिला प्रत्येक क्षणी मिळणारी तिच्या आईची खंबीर साथ दाखवण्यात येणार आहे. लहान मुलीची निरागसता, निराधार अश्या धार्मिक रूढी आणि अंधश्रद्धा ज्या आपल्या समाजामध्ये बऱ्याच काळापासून चालत आल्या आहेत याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हेमांगी कवि मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अनुभवी कलाकारांचा संच, अनोखी कथा, वैशिष्टयपूर्ण चित्रीकरण, स्थळं यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल.”

१६ वर्षांत १७ नाटकांची निर्मिती आणि ३००० च्या वर प्रयोग सादर केल्यानंतर चंद्रकांत लोहोकरे तसेच Television दुनियेतील यशस्वी लेखक अभिजीत गुरु यांच्या अग्रगण्य क्रिएशन्सची ही पहिलीच मालिका असणार आहे. चंद्रकांत लोहोकरे म्हणाले, या मालिकेत वेगळ्या विषयाच धाडस आम्ही करतोय. पण ते करत असताना television प्रेक्षकांच्या अपेक्षांना आम्ही अजिबातच धक्का पोहोचू देणार नाही. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊनच यातील प्रमुख कलाकार मंडळी म्हणजेच हेमांगी कवि आणि सुशील इनामदार आपलं अभिनय कसब पणाला लावण्यास सरसावले आहेत. कथा सादरीकरण आणि निर्मिती मुल्य ही लोकांना सुखावून जाईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू.

तर अभिजीत गुरु म्हणाले, बर्‍याच यशस्वी मालिकांचं लिखाण केल्यानंतर एक निर्माता म्हणून स्वत:ची मालिका बनवेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज स्वत:साठी लिहायची संधी मिळाली आहे, आणि संधीच सोन करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. लेक माझी दुर्गा नावावरून जे काही तुम्हाला वाटत असेल तसं अजिबात नाही. केवळ कव्हर बघून पुस्तकात काय लिहलय आहे त्याचा अंदाज बांधण चुकीचं आहे. विषय वेगळा आहे, आणि या मालिकेतून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.”

हेमांगी कवि म्हणाली, “लेक माझी दुर्गा” मालिकेत मी वैजयंती “वैजु” नावाची भूमिका साकारते आहे जी दुर्गाची आई आहे. आपण नेहेमीच बघतो आई म्हंटल की, मायाळू, दयाळू, सोशिक, परिस्थितीला सांभाळून घेणार्‍या अश्याच असतात. पण ही आई अगदीच वेगळी आहे, वैजु परिस्थितीशी भांडणारी आहे. तिच्या लेकीच्या मार्गात काही अडथळे आले, विघ्न आले तर तिच्यासाठी ती दुर्गेसारखी उभी रहाणारी आहे. असे एक वेगळेपण आहे या आईमध्ये. अभिजीत गुरु यांनी खूप उत्तमरित्या हे पात्र उभं केलं आहे. अशाप्रकारच पात्र सकारण हे एक आव्हान आहे असं मला वाटतं. मी आशा करते रसिक प्रेक्षकांना आमची मालिका आवडेल.

मुलीच्या आयुष्यातील पहिला नायक म्हणजे तिचे बाबा. त्यांच्याच प्रेमापासून जर मुलगी दूर राहिली तर तिच्या मनात अनेक शंका घर करून बसतात. आई आणि वडिलांच्या हाताच्या ओंजळीत मुलं वाढतं, सुरक्षित राहतं. या ओंजळीतला एक हात जरी बाजूला झाला तर मुलं गोंधळतात. अशीच परिस्थिती आपल्या दुर्गावर देखील ओढवली आहे. का ती वडिलांच्या प्रेमापासून वंचित आहे ? का तिचे वडील तिला दूर ढकलत आहेत ? का दुर्गाला तिच्याच वडिलांचे कटू बोल ऐकावे लागत आहे ? काय आहे या मागचं कारण. जाणून घेण्यासाठी बघा लेक माझी दुर्गा – जाणीव “ती” च्या अस्तित्वाची कलर्स मराठीवर १४ फेब्रुवारीपासून दररोज संध्या ७.३०. वा. आपल्या कलर्स मराठीवर. आणि याच दिवसापासून नक्की बघा आपली लाडकी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका नव्या वेळेत रात्री १०.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Tags: Entertainmentlek mazhi durgamarathimarathi television

शिफारस केलेल्या बातम्या

कंगनाने उडवली दिलजीत दोसांझची खिल्ली
बॉलिवुड न्यूज

कंगनाने उडवली दिलजीत दोसांझची खिल्ली

5 hours ago
करीना कपूरने कपिल शर्माला विचारले,’तू  रिअल लाईफमध्ये रोमँटिक आहेस का?’
बॉलिवुड न्यूज

करीना कपूरने कपिल शर्माला विचारले,’तू रिअल लाईफमध्ये रोमँटिक आहेस का?’

1 day ago
धर्मेंद्र लवकरच करणार ऑनस्क्रीन कमबॅक
बॉलिवुड न्यूज

धर्मेंद्र लवकरच करणार ऑनस्क्रीन कमबॅक

1 day ago
शहनाज गिलने केले सारा अली खानला जबरदस्तीने किस
बॉलिवुड न्यूज

शहनाज गिलने केले सारा अली खानला जबरदस्तीने किस

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

Most Popular Today

Tags: Entertainmentlek mazhi durgamarathimarathi television

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!