नगर – जिल्ह नियोजन समितीच्या निवडणुकीवर आलेल्या दोन किरकोळ हरकती रद्दबातल करण्यात आल्याने निवडणूक प्रशासनाने नियोजन समितीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार 24 डिसेंबरला पाच जागांसाठी मतदान होवून 26 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या महानगरपालिका तीन,जिल्हा परिषद एक व नगरपालिका एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.यासाठी मनपाचे 68 नगरसेवक,जिल्हा परिषदेतील 72 सदस्य व नगरपालिका-नगरपरिषदेचे 230 नगरसेवक अशा एकूण 370 मतदारांची यादी बुधवारी प्रसिध्द करण्यात आली. त्यावर हरकती घेण्याची मुदत आज सायंकाळपर्यंत होती.या वेळेत दोन हरकती आल्या मात्र त्या नाममात्र स्वरूपात असल्याने निवडणूक प्रशासनाने रद्दबातल करत निवडणूक जाहीर केली.
यात अर्ज दाखल 2 डिसेंबरपासून करण्यात येणार आहेत.5 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून अर्ज अपीलाची मुदत 9 डिसेंबरपर्यंत आहे.अर्ज माघारीची मुदत 14 पर्यंत असून मतदान 24 ला तर मतमोजणी 26 डिसेंबरला होईल. जिल्हा नियोजन समितीत जाण्यासाठी राष्ट्रवादी,शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षाच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच राहणार आहे. महापालिका क्षेत्रातमन सुरेखा कदम,गणेश भोसले व सुनील कोतकर यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.तर नगरपालिका क्षेत्रातून भरत नाहाटा यांची मुदत संपुष्टात आली आहे.