सिमरनजीतसिंगचे सुवर्ण यश

कॉलोग्ने विश्‍वचषक मुष्टियुद्ध स्पर्धा

नवी दिल्ली – भारताचा अव्वल मुष्टीयोद्धा अमित पंघाल याला 52 किलो वजनी गटात प्रत्यक्ष सामना न खेळताच सुवर्णपदक मिळाले आहे. जर्मनीत सुरू असलेल्या कॉलोग्ने विश्‍वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीची लढत न खेळताच सुवर्णपदक मिळाले. 

त्याच्यासह सिमरनजीत सिंग कौर व मानीष यांनीही सुवर्ण यश मिळवले. सतीश कुमारला मात्र, 91 किलो गटात दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्यामुळे रजतपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने 3 सुवर्ण, 2 रजत तर 4 ब्रॉंझपदके मिळून एकूण 9 पदके पटकावली. 

अमितला जर्मनीच्या अर्गिश्‍ती टेर्टेरियानविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली. सतीशने फ्रान्सच्या डॅमिली डिनी मॉइन्झेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पण जर्मनीच्या नेल्व्ही टियाफॅकविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली.

महिला गटात सिमरनजित सिंग कौरने 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकताना जर्मनीच्या माया केलहॅन्सचा 4-1 असा पराभव केला. मानीषने साक्षीचा 3-1 असा पराभव केला. पूजा रायला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. नेदरलॅंड्‌सच्या नॉचका फॉंटिनने तिला पराभूत केले. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात महंमद हसमुद्दीन व गौरव सोलंकीला ब्रॉंझपदक मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.