भोपाळ – मध्य प्रदेशच्या सिंगरोली जिल्ह्यात आज (दि. 1) दोन रेल्वे मालगाड्यांचा अपघात झाला आहे. कोळसा वाहून नेणाऱ्या या दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, रेस्क्यू ऑपरेशन केले.
Madhya Pradesh: 2 cargo trains carrying coal collide in Singrauli. Loco pilot and assistant loco pilot reported to be trapped. Rescue operation by NTPC team and police is underway. pic.twitter.com/QxYd3DhsRU
— ANI (@ANI) March 1, 2020
बैढन ठाणा क्षेत्रातील रिहन्द नगर येथून एक मालगाडी कोळसा वाहून नेत होती. तर, दुसऱ्या दिशेने रिकामी मालगाडी येत होती. या दोन्ही मालगाड्यांची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाड्यांचे डब्बे रुळावरुन घसरले आणि ही दुर्घटना घडली.
#UPDATE Madhya Pradesh: 3 people dead after two cargo trains carrying coal collided earlier today in Singrauli. pic.twitter.com/TzXAFdHoGD
— ANI (@ANI) March 1, 2020