नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन हेलिकॉप्टमध्ये धडक झाल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये जवळपास १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. दक्षिणी हेलमंदस्थित नावा जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडली.
टोलोच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे कमांडोंना एका ठिकाणी आणले जात होते आणि तेथून जखमी सुरक्षा दलांना घेऊन जात होते. यादरम्यान दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये टक्कर झाली.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर त्याचवेळी, प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते ओमर झवाक यांनी नावा जिल्ह्यात झालेल्या अपघाताची पुष्टी केली, परंतु त्याविषयी फारशी माहिती दिलेली नाही.