पुणे – शहरातील महाविद्यालये आता सोमवार ऐवजी मंगळवारी उघडणार आहे. येत्या सोमवारी लाखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीसह शेतकरी संघटना, कामगार संघटना यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. त्यामुळे, त्याचा परिणाम एसटी तसेच पीएमपीच्या वाहतुकीवर होणार असल्याने महाविद्यालीयन मुलांना अडचणींचा सामना करावा लागेल.
त्यामुळे, पालक तसेच महाविद्यालयाकडून मागणी करण्यात आल्याने महापालिकेने शहरातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय एक दिवस पुढे ढकलला असून आता पुण्यात महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारी सुरू करण्याचे सुधारीत आदेश महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत.