सातारा – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या अचानक महिनाभराच्या रजेवर गेल्या असून त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सिंघल यांच्या अचानक रजेवर जाण्याने महसूल विभागात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीच बदली होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, यादरम्यान त्यांची बदली झाली नव्हती. सिंघल यांची बदली होण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच मिळाले होते. श्वेता सिंघल या दि. 27 डिसेंबर पर्यंत अचानक रजेवर गेल्या आहेत. त्यांचा कार्यकाल पूर्ण होत आल्याने त्यांच्या बदलीचे संकेत मिळत आहेत.