जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप

पुणे – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही बुधवारी प्रवेश देण्यात आला नाही. प्रत्येक मजल्यावर पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने होतात. बुधवारी येथे विविध संघटनांचे तीन मोर्चे होते. तसेच मराठा आरक्षण आंदोलनामुळेही जिल्हाधिकारी कार्यालयावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली. बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची यामुळे गैरसोय झाली. समोरील प्रवेशद्वारातूनच नागरिकांना सोडले जात होते. प्रत्येक मजल्यावरून पार्किंगकडे जाणारे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक मजल्यावर 20 ते 25 पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते. सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही सोडले जात नसल्याने कार्यालयात सामान्य नागरिकांची गर्दी दिसून आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)