जळोची : शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १५ जुलै पासून लॉकडाऊन करण्याचा सूचना जाहीर झाल्या. शहरातील वसंतनगर भागात तब्बल १४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने या भागात पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली.
त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तहसीलदार विजय पाटील, डी वाय एस पी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटीलसह आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी वसंतनगर मधील परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी यांना सूचना करून आवश्यक असणारे साहित्य व टेस्ट संदर्भात सूचना केल्या. यावेळी स्वयंसेवक महेश गायकवाड, सयाजी गायकवाड, पत्रकार संतोष जाधव यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून करत असलेल्या कामाबाबत कौतुक केले. तसेच यावेळी सुयश गायकवाड, गौरव जाधव सह इतर स्वयंसेवक उपस्थित होते.