पुलवामा हल्ल्या पार्श्वभूमीवर कलाकारामध्ये कोल्डवॉर सुरु

मुंबई – पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने दिला आहे.

-Ads-

या निर्णयानंतर पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आपला संताप सोशल माध्यमांमध्ये व्यक्त केला आहे. ”पाकिस्तानने केवळ आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला केला नाही तर उघडपणे आपल्याला आव्हान दिले आहे. भारताच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवून आपला अपमान केला आहे. या हल्ल्यानंतर जो शांततेबद्दल बोलेल त्याचे तोंड काळे करा. त्याची गाढवावर धिंड काढा, असेही कंगना म्हणाली.” यावर ट्विट पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट केले आहे कि,’व्यवसायात समस्या येऊ लागल्यात की काही लोक ‘नॅशनल कार्ड’ खेळतात, असे ट्विट रबियाने केले आहे.’ विशेष म्हणजे, आपल्या या ट्विट मध्ये तिने कंगना राणौतला टॅग केले आहे. सोशल माध्यमांद्वारे कलाकारामध्ये  भारत पाकिस्थान कोल्डवॉर सुरु झाले आहे.

What is your reaction?
10 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)