दिवसभर गार वारा : थंडीही वाढली
पुणे – शहरातील थंडी दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होत होती. शुक्रवारी देखील दिवसभर वातावरणात गारवा होता.
शुक्रवारी मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तर विदर्भात तुरळक भागात किमान तापमानात तुलनेत लक्षणीय वाढझाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
पुणे शहरात आणि आसपासच्या परिसरात पहाटे आणि रात्री अधिक होती. तर वातावरणात दिवसभर गारवा होता. हवामान विभागाच्या नोंदीनुसार शुक्रवारी शहरात कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
मागील 24 तासांत राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. यासह 1 डिसेंबरपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.