नवी दिल्ली – राजधानी दिल्लीला आज थंडीच्या लाटेचा सामना करावा लागला असून या शहरातील तापमान आता 1.4 अंश सेल्सियस इतके खाली गेले आहे. हवामान विभागाने यापूर्वी 17-18 जानेवारीपर्यंत दिल्लीत थंडीची लाट येण्याची ऑरेंज वॉर्निंग जारी केली होती. त्यानुसार हवामान खात्याचे हे भाकित खरे ठरले आहे.
दिल्लीत 5 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत तीव्र थंडीची लाट आली होती, जी गेल्या संपुर्ण दशकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थंडीची लाट होती असे हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
मनरेगा निधीबाबत सापत्न वागणूक; प. बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रु. थकीत – ममता बॅनर्जी
दिल्लीतील धुक्याचे प्रमाणही धोकादायक स्थितीत गेले असून त्यामुळे सामान्य जनजीवनही विस्कळीत होत आहे. मैदानी भागात, किमान तापमान 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यास शीतलहर घोषित केली जाते.