ब्रिटनमध्ये महात्मा गांधींवरील नाण्याचा विचार सुरू

लंडन – महात्मा गांधींची मुद्रा असलेले एक नाणे प्रकाशित करण्याचा ब्रिटनमध्ये विचार सुरू आहे. कृष्णवर्णीय, आशियाई आणि भारतीय नेत्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जावी, अशी मागणी सध्या ब्रिटनमध्ये वाढीस लागली आहे. 

त्या पार्श्‍वभूमीवर महात्मा गांधींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी लवकरच त्यांच्यावर एक नाणे प्रकाशित केले जाऊ शकेल. यासाठी ब्रिटनमधील भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सौनक यांनी पुढाकार घेतला आहे. 

अमेरिकेत मिनियापोलीस इथे जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्‍तीचा पोलिसांच्या क्रौर्यामुळे झालेल्या मृत्यूनंतर अमेरिका आणि संपूर्ण युरोपात कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठीचे आंदोलन पसरले. त्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनमधील अनेक संस्थांनी आपल्या धोरणांचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

कृष्णवर्णीय, आशियाई आणि भारतीय (“ब्लॅक एशियाई मायनॉरिटी एथनिक’- बीएएमई) व्यक्‍तींच्या हिताच्या उपक्रमांसाठी गुंतवणूक करून काही उपक्रम सुरू केले जाऊ लागले आहेत.

राजघराण्याच्या शाही टांकसाळीला लिहिलेल्या पत्रामध्ये ऋषी सौनक यांनी कृष्णवर्णीय आणि वांशिक अल्पसंख्य समुदायच्या योग्यतेची दखल घेण्याची विनंती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.