जालियनवाला बाग हत्याकांड : शताब्दीनिमित्त शंभर रूपयाच्या नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली – आज जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. जालियनवाला बाग घटनेच्या शताब्दीनिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शंभर रूपयाच्या नाण्याचे आणि पोस्ट तिकिटाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर उपराष्ट्रपतीनी जालियनवाला बाग येथे जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

जालियनवाला बाग हत्याकांडास शंभर वर्षे पुर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येने लोक पोहोचु लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी,  जालियनवाला बाग येथे जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.