नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 107 विदेश दौऱ्यातील विविध छायाचित्रांचा समावेश असलेले कॉफी टेबल बुक आज 16 व्या प्रवासी भारतीय दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले.
मोदी इंडिया कॉलिंग-2021 असे या पुस्तकाचे नाव आहे. भाजप नेते विजय जॉली यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. दिल्लीप्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या हस्ते त्याचे आज प्रेस क्लब मध्ये प्रकाशन करण्यात आले.
हे पुस्तक राहुूल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनाहीं आपण भेट म्हणून देणार आहोत असे विजय जॉली यांनी यावेळी बोलताना सांगितले. आदेश गुप्ता म्हणाले की मोदींनी भारताच्या विदेश नितीचे सारे परिमाणच बदलून टाकले आहे. या पुस्तकातून त्यांच्या विदेश नितीची झलक पहायला मिळते असे त्यांनी म्हटले आहे.