आचारसंहितेचा दणका : मुंबई उपनगरातून 10 हजार होर्डिंग्ज हटवले 

मुंबई – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे राजकिय पक्षांच्या होर्डिंग्ज, बॅनर आणि फलक तसेच पोष्टरबाजीला दणका बसला आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 8 हजार 465 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आलेले आहेत. खाजगी मालमत्तेवरील 2 हजार 226 असे एकूण 10 हजार 691 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.

मुंबई उपनगर जिल्हयात 29 एप्रिल, 2019 (सोमवार ) रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून 23 मे, 2019 (सोमवार ) रोजी मतमोजणी होणार आहे. या जिल्हयात 4 लोकसभा मतदार संघ आहेत, त्यात 26 विधानसभा मतदार संघ अंतर्भूत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.