लिस्बन (पोर्तुगाल) – पोर्तुगालच्या समुद्रामध्ये करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पोलिस कारवाईमध्ये तब्बल 232 दशलक्ष डॉलर किंमतीचे कोकेन पकडण्यात आले आहे. अटलांटिक महासागरामध्ये एका बोटीवर कारवाई करून हे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची किंमत अंदाजे 200 दशलक्ष युरो म्हणजेच 232 दशलक्ष डॉलर असल्याची माहिती मिळते आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात अलिकडच्या काळात ज्प्त करण्यात आलेला हा पहिलाच मोठा साठा असल्याचे पोर्तुगालच्या पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या 15 वर्षात पोतुर्गालमध्ये करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी समुद्रामध्ये 79 फूट लांबीचा तराफा हेरून त्याचा पाछठलाग करून ही कारवाई केली. त्या तराफ्यावर कोकेनची 183 पोती होती. हे कोकेन आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचे असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. आयबेरियन द्विपसमुहाच्या मार्गे हे कोकेन युरोपात आणले जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी तिगाजणांना अटक करण्यात आली असून त्यांना पोर्तुगालला आणले जात आहे. या आंतरराष्ट्रीय मोहिमेमध्ये पोर्तुगाल, स्पेन, अमेरिकेतील अमली पदार्थ विरोधी संस्ता आणि ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हे विरोधी संस्था सहभागी झाली होती.