कोका-कोलाच्या २२०० कामगारांच्या नोक-या धोक्यात

कोरोना व्हायरस महामारीचा परिणाम

मुंबई – कोरोना व्हायरस महामारीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. जागतिक पातळीवर अनेक व्यवहार ठप्प झाले, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, ज्याच्यामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या नोक-या संकटात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी पेय कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलानेही यादरम्यान मोठी घोषणा केली आहे. कंपनी नोक-या कपात करणार आहे असं सांगितले गेले आहे.

कोका-कोलाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या महामारीनंतर २०२१ मध्ये बाजारपेठेतील चांगल्या तयारीसाठी पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून २२०० नोक-यांमध्ये कपात केली जाईल, वास्तविक कोरोनामुळे यावर्षी विक्रीवर परिणाम झाला आहे. कंपनीच्या प्रवक्ते म्हणाले की, या महामारीमुळे त्याचा परिणाम कंपनीच्या जागतिक वर्कफोर्सच्या २.६ टक्के होईल आणि केवळ अमेरिकेतच १,२०० कर्मचा-यांच्या नोक-या धोक्यात आल्या आहेत.

कोका-कोलाने एक वॉलंटरी सेपरेशन कार्यक्रम तयार केला आहे, परंतु काही टप्प्यावर ‘इनवॉलंटरी’ काम करणा-यांना कमी करण्याची देखील आवश्यकता असेल. त्यामुळे यात बदल घडवून आणण्याचे काम सुरु आहे. आॅगस्टच्या घोषणेनुसार कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कर्मचा-यांच्या तुटवड्यामुळे १७ ते ९ युनिटमध्ये काम कमी झाले आहे. ग्लोबल सेव्हरन्स प्रोग्राममधून ३५०० दशलक्ष ते ५५०० दशलक्ष डॉलर्स खर्च होण्याची कंपनीची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.