रायपुर – छत्तीसगड मधील नक्षलवाद्यांच्या विरोधातील कमांडो कारवाईच्या वेळी सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो फोर्सच्या एका कमांडोने स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. छत्तीसगडच्या सुकुमा जिल्ह्यात हा प्रकार घडला.
हेडकॉन्स्टेबल हरजीतसिंग असे या कमांडोचे नाव असून त्याने स्वत:च्या रायफली मधून गोळ्या झाडून घेऊन हा प्रकार केला. हरजीतसिंग हा कोब्रा कमांडोच्या 206 व्या बटालियन मध्ये कार्यरत होता. कोब्रा कमांडो ही विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स मानली जाते.
त्यामार्फत सुकुमा जिल्ह्यातील जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला हा प्रकार घडला. त्याने आत्महत्या केली की त्याच्या रायफलीतून चुकून ही गोळी सुटली याची खातराजमा केली जात आहे. हरजीतिंसंग हा मुळचा पंजाबातील लुधियानाचा रहिवासी होता.