सातारा (प्रतिनिधी)- राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर कराडमधील क्रुष्णा।हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बाळासाहेब पाटील यांना काल रात्रीपासून त्रास जाणवू लागला, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. करोना काळात त्यांनी विविध पातळ्यांवरील बैठका घेऊन परिस्थिती नियंणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत करोना आढावा बैठक गेल्या रविवारी कराडमध्ये झाली होती. या बैठकीचे नियोजनात पाटील यांचा मोठा पुढाकार होता. त्यांची प्रक्रुती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.