पुणे – सीएनजी गॅसच्या दरात घट होणार असून सीएनजी दरात प्रतिकिलो 85 पैशांची. तर, घरोघरी वापरासाठीच्या पीएनजी गॅस 50 पैशांनी कमी होणार आहे. शनिवारपासून (दि.10) यांची अंमलबजावणी होणार आहे.
देशात गेल्या काही महिन्यांपासुन सातत्याने इंधनदरवाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून शहरातील सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि घरगुती वापरासाठी असलेला पाइप नॅचरल गॅस या दोन्हींचे दर कमी करण्यात आले आहेत.
सध्या, शहर हद्दीत सीएनजी गॅस 54.80 रुपये तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसची किंमत 27.70 रुपये स्टॅण्डर्ड क्यूबीक मीटर (एससीएम) आहे. आता सीएनजी दरात किलोमागे 85 पैशांची घट होऊन 53.95 नवा दर असणार आहे.
तर, घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजीची किंमत 50 पैशांनी कमी होऊन 27 रुपये 20 पैसे दर आकारण्यात येणार आहे.