इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यशासनाने सी एन जी वरील वॅट १० टक्के कमी केला असल्याने उद्या (१ एप्रिल ) पासून राज्यात सी एन जी ५ ते सात रुपये स्वस्त होणार होता. मात्र, शासनाने ३१ मार्च च्या मध्यरात्रीत सीएनजी दरात अडीच रुपये गुपचूप वाढ केली आहे. त्यामुळं पुण्यात नवीन दर ६८.५० पैसे झाला आहे.
गेल्या सहा महिन्यात सी एन जी दरात केंद्राने जवळपास साडे अकरा रुपये वाढ केली आहे. त्यामुळे ५४ रुपये असेल सी एन जी ६६ रुपयावर गेला होता. त्यानंतर आता पेट्रोल सोबत सी एन जी मध्येही वाढ झाल्याने राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयाचे केंद्राने एप्रिल फूल केले असून आता नागरिकांना राज्यात सीएनजी मध्ये अडीच ते पाच रुपयांची सवलत मिळेल असे चित्र आहे. ही दरवाढ झाल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष आली दारूवाला यांनी दिली.